लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला लक्ष्मीकांत बेर्डेचा मुलगा अभिनय बेर्डेचा आगामी ‘अशी ही आशिकी’ हा चित्रपट येणार आहे. मागील वर्षी प्रेम, कन्फेशन, इमोशन आणि ‘अशी ही आशिकी’, अशी दमदार टॅगलाईन असलेला चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटातील सोनू निगमच्या आवाजातील पहिले गाणे आता रिलीज करण्यात आले आहे.
अभिनय बेर्डेच्या ‘अशी ही आशिकी’चे सोनू निगमच्या आवाजातील पहिले गाणे रिलीज
या गाण्याचे बोल ‘रक्कमा’ असे आहेत. या गाण्याच्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांना नवीन वर्षात सोनू निगमच्या आवाजाची जादू अनुभवयाला मिळणार आहे. ‘रकम्मा’ हे गाणे सोनू निगम यांनी गायले आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील सगळी गाणी सोनू निगम यांनीच गायली आहेत. सचिन पिळगांवकर यांनी या चित्रपटाच्या गाण्यांना संगीत दिले असल्यामुळे, सोनू निगम यांचा आवाज आणि सचिन पिळगावकर यांचे संगीत असल्यामुळे ‘अशी ही आशिकी’चा म्युझिकल अल्बम प्रेक्षकांसाठी जणू एक म्युझिकल ट्रिट असेल.
लवकरच ‘अशी ही आशिकी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मीती गुलशन कुमार प्रस्तुत, टी-सिरीजचे भूषण कुमार आणि क्रिशन कुमार यांनी केली आहे. तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगांवकर हे करत आहेत. या चित्रपटात अभिनय बेर्डे आणि हेमल इंगळे ही जोडी स्क्रिन शेअर करत आहेत. १४ फेब्रुवारी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.