भारतातील या राजकीय नेत्यांवर बनविले गेले आहेत बॉलीवूड चित्रपट

bollywood
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर आधारित ‘द अॅसिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा अनुपम खेर अभिनित चित्रपट येत असून, आता पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आगामी चित्रपटाचे पोस्टरही नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. हे पोस्टर प्रदर्शित होताच सोशल मिडीयावर झपाट्याने व्हायरल होत आहे. या चित्रपटामध्ये मोदींच्या भूमिकेमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय दिसणार असून, या पोस्टरमध्ये विवेक हुबेहूब मोदींप्रमाणे दिसत आहे. मनमोहन सिंह आणि आता नरेंद्र मोदी या दोन नेत्यांच्या व्यक्तिरिक्त बॉलीवूडमध्ये आजवर आणखीही काही नेत्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविण्यात आले आहेत.
bollywood1
मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट संजय बारू यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित आहे. हा चित्रपट, त्याचे ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच वादांच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘बोस- डेड ऑर अलाईव्ह’ हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला असून, यामध्ये नेताजींची भूमिका अभिनेता राजकुमार रावने केली होती. तसेच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित ‘सरदार’ या चित्रपटामध्ये वल्लभभाईंच्या भूमिकेमध्ये अभिनेता परेश रावल दिसले होते. हा चित्रपट १९९३ साली प्रदर्शित झाला होता. केतन मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.
bollywood2
अनेक विवाद आणि उलट सुलट चर्चांना कारणीभूत ठरलेली, तसेच कायद्याच्याही कचाट्यात सापडलेली मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदू सरकार’ ची नायिका इंदिरा गांधी यांच्यावरून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. त्याचप्रमाणे १९७५ साली गुलझार दिग्दर्शित चित्रपट ‘आंधी’ हा देखील इंदिरा गांधींच्याच आयुध्यावर आधारित असल्याचे म्हटले जाते. यामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये अभिनेत्री सुचित्रा सेन दिसल्या होत्या.

Leave a Comment