पंकजा मुंडेंचा मंत्रालयात पाऊल न टाकण्याच्या वक्तव्यावरून यू टर्न

pankaja-munde
मुंबई – राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे सोमवारी धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मंत्रालयात पाऊल टाकणार नाही, असे म्हणाल्या होत्या. त्याचबरोबर त्यांनी धनगर आरक्षणात कोणी आडकाठी आणली तर ही काठी उगारायला मागे-पुढे पाहणार नसल्याचेही म्हटले होते. पण त्या आज दुसऱ्याच दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दाखल झाल्याने त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

पत्रकारांनी याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मंत्रालयात मी येणार नाही, असे म्हटले नव्हते. धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्हाला पुन्हा सत्तेत येता येणार नसल्याचे म्हटले होते. मी आजही माझ्या त्या वक्तव्यावर ठाम आहे.

Leave a Comment