हजला जाणाऱ्या महिलांसाठी सौदी सरकारकडून भारताला सवलत

hajj
सौदी अरेबियाने हज यात्रेच्या नियमांमध्ये भारताला सूट देत 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांना हज यात्रेवर येण्याची परवानगी दिली आहे. या संदर्भात भारत सरकारने सौदी सरकारकडे विनंती केली होती. ती सौदीने मान्य केली आहे.

भारत सरकारने 2014 मधील हज यात्रेसंबंधात नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव सौदी सरकारकडे दिला होता. यात म्हटले होते, की 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांना महरमच्या बंधनातून मुक्त करावे. त्यामुळे किमान चार हज यात्रेकरूंच्या जथ्थ्यासोबत या महिला आता हजला जाऊ शकतील, असे तसनीम या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

हज यात्रा ही इस्लामच्या 10 मूलभूत सिद्धांतांपैकी एक आहे. आतापर्यंत मुस्लिम महिलांना हजवर जाणे अवघड होते कारण त्यांना हजवर जाण्यासाठी महरम साथीदाराची गरज असे. मात्र आता हे बंधन काढून टाकण्यात आले आहे.

दरम्यान, यामुळे भारतीय महिलांनी मोठ्या संख्येने हजवर जाण्यासाठी अर्ज केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी हजसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या पाच पटीने वाढू शकते, असे सूत्रांनी या वृत्तसंस्थेला सांगितले.

Leave a Comment