ऐकावे ते नवलच ! भिंतीवरील कोळ्याला जीवे मारण्याची धमकी !

spider
पश्चिमी ऑस्ट्रेलिया मधील एका शहरामध्ये पोलिसांना अचानक एक लहान मुलाच्या आवाजातील इमर्जन्सी कॉल आला. फोनवर लहान मुलगा बोलत असताना मागून आणखी एक आवाजही ऑपरेटरला ऐकू येत होता. ‘तू मरत का नाहीस?’ असा प्रश्न करणारा हा आवाज होता. हा सर्व प्रकार ऐकून कोणाच्या तरी जीवाला धोका असल्याचे ऑपरेटरच्या लक्षात आले. तिने ही सूचना त्वरित ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना देताच, पोलीस पथक तातडीने संबंधित ठिकाणी रवाना झाले. जेव्हा पोलीस संबंधित पत्त्यावर पोहोचले, तेव्हा ही एक मनुष्य मोठमोठ्याने ‘तू मरत का नाहीस’ असे ओरडत होता खरा, पण हे तो कोणत्याही व्यक्तीला उद्देशून म्हणत नसून, चक्क भिंतीवर सरपटणाऱ्या एका कोळ्याला उद्देशून हा प्रश्न असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
spider1
‘गार्डियन’ वृत्तपत्राने प्रसिद्ध ऐकलेल्या वृत्तानुसार ही घटना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पर्थ शहरामधी घडली. घटनेची हकीकत अशी, की एक पादचारी रस्त्यावरून चालत जात असताना, त्या रस्त्यावरील घराच्या बाहेर उभ्या असलेल्या एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानी आला. त्याचबरोबर घराच्या आतून कोणी तरी इसम ‘तू मरत का नाहीस?’ असे ओरडत असल्याचेही त्याला ऐकू आले. त्या माणसाच्या आग्रहावरूनच लहान मुलाने पोलिसांना पाचारण केले. पोलीस संबंधित ठिकाणी पोहोचल्यावर खरा प्रकार उघडकीला आला. संबंधित इसमाला कोळ्यांचे अतिशय भय वाटत असून, हा एक प्रकारचा ‘फोबिया’ म्हणता येईल. यालाच मानसशास्त्रीय भाषेमध्ये ‘अराश्नोफोबिया’ म्हटले गेले आहे. या फोबियामध्ये माणसाला कोळी किंवा तत्सम किड्यांची भीती इतकी जास्त आस्ते, की क्वचित प्रसंगी ही भीती जीवघेणी देखील ठरू शकते.
spider2
या घटनेनंतर पोलिसांकडून आलेल्या प्रतिक्रियेनुसार या सर्व घटनेमध्ये भिंतीवरील कोळ्याखेरीज इतर कोणालाही कसलीही इजा झाली नसल्याचे समजते. या घटनेचे सविस्तर वर्णन ट्वीटरवर व्हायरल झाले असून, या घटनेने लोकांचे चांगलेच मनोरंजन झाले आहे.

Leave a Comment