महाराष्ट्र आणि मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार होणे शक्‍य नाही

aamir-khan
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान याने महाराष्ट्र आणि मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार होणे शक्‍य नाही, असे म्हणत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल गौरवोद्‌गार काढले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील “ठाकरे’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अनेक चित्रपट निर्माते, बड्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याबाबतचा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला होता, आमिर खान याने यावर ही प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रालयातील विधीमंडळ वार्ताहर कक्षात वैद्यकीय शिक्षण विभाग आणि डॉ. संजय बोरूडे यांच्यावतीने मुलांमधील लठ्ठपणा कमी कसा करावा, या माहितीच्या संकेतस्थळाचे उद्‌घाटन आमिर खान यांच्या हस्ते झाले. या वेळी वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

Leave a Comment