नेटकऱ्यांनी शाहिद आफ्रिदीला पॉर्नस्टार म्हणून हिणवले

shahid-afridi
लाहोर – नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या लुकमध्ये बूम बूम नावाने प्रसिध्द असलेला पाकिस्तानाचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी पाहायला मिळतो. त्याच्या लुकची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते. त्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो त्यात वेगवेगळ्या लूकमध्ये दिसून येत आहे. काहीजण त्याच्या या वेगवेगळ्या लुकचे कौतक करत आहेत, तर त्याला पॉर्नस्टार जॉन सिनाची उपमा काहींनी दिली आहे.

तो या व्हिडिओत कधी डॉक्टर तर कधी ड्रायव्हर तर कधी कॉन्ट्रॅक्टर झालेला दिसून येत आहे. याबाबत शाहिद आफ्रिदीची अजून प्रतिक्रिया आलेली नाही. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून शाहिद आफ्रिदीने निवृत्ती स्वीकारली आहे. त्याने केवळ २७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने १७१६ धावा केल्या असून ४८ गडी बाद केले आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केली असून ३९८ एकदिवसीय सामन्यात ८०६४ धावा केल्या आहेत. ९९ टी-२० सामन्यात १४१६ धावा झोडपून काढल्या आहेत. तसेच ९८ गडी बाद केले आहेत. सध्या तो पाकिस्तानच्या लीग मॅचमध्ये खेळत आहे.

Leave a Comment