भारताविरुद्ध होणा-या एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा

combo
सिडनी – क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी १४ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ३४ वर्षीय गोलंदाज पीटर सिडलसह नॅथन लॉयन आणि उस्मान ख्वाजा यांची संघात वर्णी लागली आहे.

संघात ट्रॅविस हेड, क्रिस लिन, डार्सी शॉर्ट आणि बेन मॅकडरमॉट आणि गोलंदाज नाथन कुल्टर नाइल, एश्टन एगरल यांना संधी देण्यात आलेली नाही. तर कसोटी मालिकेनंतर मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांना आराम देण्यात आला आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी ६ महिन्यांचा अवधी बाकी असल्यामुळे ही मालिका दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाची आहे. ऑस्ट्रेलियाला यापूर्वी मायदेशात दक्षिण आफ्रिकेने २-१ असे नमविले होते.

ऑस्ट्रेलियाचा संघ – अॅरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरेडॉर्फ, एलेक्स कॅरी, पीटर हॅन्ड्सकॉम्ब, उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, मिशेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, जाइ रिचर्ड्सन, पीटर सिडल, बिली स्टानलेक, मार्कस स्टॉयनिस, अॅडम झम्पा

भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धौनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी

Leave a Comment