२ हजार रुपयांच्या नोटांची छपाई घटविली

notes
दोन वर्षापूर्वी नोटबंदी केल्यानंतर नव्याने चलनात दाखल केल्या गेलेल्या २ हजार रु. मूल्याच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेने लक्षणीय रित्या घटविली असल्याचे वित्त मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून समजते. हे अधिकारी गुरुवारी या संदर्भात माहिती देताना म्हणाले, चलनातील जुन्या ५०० व १००० च्या नोटा बंद केल्यानंतर लगेच २ हजार व ५०० रु. च्या नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या होत्या. पण चलनात किती नोटा आहेत यावरून रिझर्व बँक आणखी किती नोटा छापायच्या याचा निर्णय घेत असते.

त्यानुसार २ हजार रु. नोटांची छपाई घटविली गेली असून त्यात नवीन काही नाही. मार्च २०१७ अखेरी २ हजार रु. मूल्याच्या ३२८.५ कोटी नोटा चलनात होत्या तर ३१ मार्च २०१८ अखेरी हि संख्या ३३६.३ कोटींवर आली. मार्च २०१८ अखेरी चलनात १८०३७ अब्ज रुपये होते त्यात ३७.३ टक्के वाटा २ हजार रु. नोटांचा होता. २०१७ मध्ये हे प्रमाण ५०.२ टक्के होते तर नोटबंदी झाल्याबरोबर हे प्रमाण ८६ टक्के इतके होते. याचाच अर्थ २ हजार रु. नोटांचे प्रमाण जाणीवपूर्वक कमी केले जात आहे.

Leave a Comment