असे आहे प्रसिद्ध लेखक रूडयार्ड किप्लिंग यांचे भारताशी नाते

rudyard
प्रसिद्ध लेखक रूडयार्ड किप्लिंग यांचे नाव घेताच आठवण होते, अतिशय लोकप्रिय ‘जंगल बुक’ ची. रूडयार्ड किप्लिंग यांच्या लेखणीतून ‘जंगल बुक’ सारखी कलाकृती साकारली आहे. या पुस्तकावर आधारित, याच नावाच्या हॉलीवूड चित्रपटाला बालचमूने भरभरून प्रतिसाद दिला. याच पुस्तकाच्या लेखकाचे, म्हणजेच रूडयार्ड किप्लिंग यांचे भारताशी, आणि विशेषतः मुंबई (तत्कालीन बॉम्बे)शी खास नाते आहे. रूडयार्ड किप्लिंग यांचा जन्म मुंबईमध्ये, १८६५ साली झाला. त्यावेळी त्यांचे वडील जॉन लॉकवूड किप्लिंग ही मुंबईतील सुप्रसिद्ध जे जे स्कूल ऑफ आर्टचे प्रथम ‘डीन’ म्हणून कार्यरत असल्याने किप्लिंग परिवाराचे वास्तव्य जे जे स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयाच्या कॅम्पसमधेच होते.
rudyard1
ज्या वास्तूमध्ये रूडयार्ड यांचा जन्म झाला ती वस्तू नंतर जुनी होऊन मोडकळीला आल्याने पाडून टाकण्यात आली, आणि त्या जागी १८८२ साली एक नवी लाकडी वास्तू उभारणात आली. अतिशय सुंदर दिसणाऱ्या आणि हिरव्या रंगाने रंगविलेल्या या वस्तूचे नामकरण ‘किप्लींग हाउस’ असे करण्यात आले. आजही ही वास्तू मोठ्या दिमाखाने उभी आहे. रूडयार्ड सहा वर्षांचे झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना इंग्लंडला धाडले. त्यानंतर रूडयार्ड भारतामध्ये परतले ते १९३० साली. तो पर्यंत अतिशय दर्जेदार लेखक म्हणून रूडयार्ड यांना जगभरामध्ये मोठी प्रसिद्धी लाभली असून, त्यांना नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले होते.
rudyard2
रूडयार्ड १९३० साली भारतभेटीसाठी आले. इंग्लंडला परतल्यानंतर अवघ्या काहीच काळानंतर, म्हणजे १९३६ साली या महान लेखकाचे निधन झाले. आज जरी हे महान लेखक हयात नसले, तरी भारताशी असलेल्या त्यांच्या नात्याची साक्ष देणारे किप्लिंग हाउस आजही त्यांची आठवण करून देत उभे आहे.

Leave a Comment