हा कर्मचारी करतो चक्क धावपट्टीवर नृत्य, झाला सोशल मीडियावर लोकप्रिय

dance
चक्क विमानांच्या धावपट्टीवर नाचणाऱ्या एका अमेरिकी विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्या या अदाकारीला हजारो लोकांनी पसंतीची दाद दिली आहे.

जाहमॉल अॅलन असे या माणसाचे नाव आहे. मी जे करतो ते मला खूप आवडते आणि प्रवाशांना खूष करण्यासाठी मी नृत्य करतो, असे अॅलन याने ‘दि ग्लोबल’ या वृत्तपत्राला सांगितले.

कॅनडामधील टोरोंटो पियर्सन विमानतळावर ख्रिसमसच्या काही दिवस आधी अॅलन याचे नाचतानाचे चित्रण एका प्रवाशाने केले. त्याने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केला. त्यानंतर इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर अनेकांनी त्याला पसंत केले आणि रिट्वीट केले.

“मला जेव्हा नाचण्याची हुक्की येते किंवा विमानातील कोणाला खुश करण्याची इच्छा होते तेव्हा मी नाचतो. ज्या दिवशी चित्रीकरण करण्यात आले त्या दिवशी विमानात रडणाऱ्या एका बाळाला हसवण्यासाठी मी नाचत होतो. माझ्यामुळे ते बाळ हसू लागले आणि त्यामुळे मी नाचत राहीलो,” असे अॅलनने सांगितले.

अॅलन सध्या 28 वर्षांचा आहे. नाचण्यामुळे आपल्या कामात कुठलाही अडथळा येत नाही, असे त्याने सांगितले. तसेच या व्हिडिओला मिळालेल्या प्रतिसादामुळे आपल्याला आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. हे एक वरदान आहे असे त्याने म्हटले.

Leave a Comment