हॉपमन कप मध्ये फेडररची सेरेनावर मात

fedarer
यंदा टेनिस स्टार फेडरर आणि सेरेना यांच्यात होणारया उत्कंठावर्धक पहिल्या वहिल्या सामन्यात फेडररने सेरेनाला मात दिली. हॉपमन कप स्पर्धेत स्वित्झर्लंड आणि अमेरिका यांच्यात झालेल्या मिश्र दुहेरी स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर- बेलिंडा बेन्किक या जोडीने अमेरिकेच्या सेरेना विलियम्स- फ्रान्सिस टिफोये या जोडीचा ४ -२, ४ – ३ असा पराभव केला.

या स्पर्धेत फेडरर आणि सेरेना या महान आणि कीर्तिमान खेळाडूना एकमेकांसमोर पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणी होती. या सामन्याला १५ हजाराहून अधिक प्रेक्षक उपस्थित होते. सामना जिंकल्यानंतर फेडरर म्हणाला, हा सामना खूपच छान झाला. सेरेना विरुद्ध खेळणे आनंदाचे होते आणि अभिमानाचेही. ती एक उत्तम खेळाडू आहे आणि खेळातील तिची एकाग्रता मला फार भावते. सेरेनाने सामना सुरु होण्यापूर्वीच फेडरर विरोधात खेळणे हे माझे स्वप्न या निमित्ताने प्रत्यक्षात आल्याचे आणि यासाठी तिने दीर्घकाळ प्रतीक्षा केली असल्याचे सांगितले होते. हा सामना दोघांसाठीही रोमांचक होता असे फेडरर म्हणाला.

Leave a Comment