नवी दिल्ली – केवळ भारतीय जनता पक्षच पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महत्वाचा आहे. पण, ते लोक कल्याणाच्या मुद्यांकडे लक्ष देत नसल्याची टीका बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी केली आहे. एक वृत्तसंस्थेला पंतप्रधान मोदींनी दिलेल्या मुलाखतीच्या पार्श्वभूमीवर मायावती यांनी हे वक्तव्य केले आहे.
मोदींना देशाची नाही तर केवळ भाजपची चिंता – मायावती
एक निवेदन बहुजन समाज पक्षाने जारी केले असून त्यांनी यात मोदींनी व्यक्त केलेल्या मतांवर टीका केली. तसेच, मोदी लोकांची आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे, असेही त्यात म्हटले आहे. भाजपने सत्तेत येण्याआधी काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. तरुणांना रोजगार देणे, गरीबीचे निर्मुलन आणि महागाई कमी करण्यात भाजप सपशेल अपयशी ठरल्याचे बसपने म्हटले आहे.
भाजपची मॉब लिंचिंगबाबत अतिशय चुकीची भूमिका राहिली आहे. राम मंदिर मुद्दा आणि गोरक्षा यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली असल्यामुळे जनमानसात नाराजगी पसरली आहे. गोरक्षेसाठी युनिफॉर्म नॅशनल लॉ आणण्याची मागणी मायावती यांनी केली.