इशरत जहां प्रकरणातील आरोपी अधिकाऱ्यांना बढती

G-L-Singhal
इशरत जहां बनावट चकमक प्रकरणातील आरोपी अधिकारी तसेच सोहराबुद्दीन शेख प्रकरणातून नुकतेच सुटलेल्या अन्य एका पोलिस अधिकाऱ्याला गुजरात सरकारने बढती दिली आहे. राज्यातील अन्य सहा अधिकाऱ्यांसहित या दोघांना पदोन्नती मिळाली आहे.

गुजरात सरकारने मंगळवारी हा आदेश प्रसिद्ध केला. इशरत जहां चकमक प्रकरणात केंद्रीय अन्वेषण खात्याने (सीबीआय) दाखल केलेल्या आरोपपत्रात सात पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत. त्यातील जी. एल. सिंघल यांनी गांधीनगरच्या कमांडो प्रशिक्षण केंद्राच्या उपमहानिरीक्षक पदावरून महानिरीक्षक (आयजीपी) पदावर बढती देण्यात आली आहे. सिंघल यांना सीबीआयने 2013 साली अटक केली होती आणि ते सध्या जामीनावर बाहेर आहेत. त्यांना बढती देऊन मे 2014 मध्ये पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आले होते.

त्यांच्या प्रमाणेच सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणात नुकतेच आरोपमुक्त केलेल्या विपुल अग्रवाल यांनाही आयजीपी पदावर बढती देण्यात आली आहे. अग्रवाल यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने नुकतेच दोषमुक्त केले होते. ते सध्या अहमदाबादचे संयुक्त पुलिस आयुक्त (प्रशासन) या पदावर कार्यरत आहेत.

Leave a Comment