
ढाका – नुकतेच बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून बांगलादेशच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार मुशर्रफ मुर्तझा यात मोठ्या फरकाने विजयी झाला आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या तिकीटावर मुर्तझाने निवडणूक लढवली होती.
बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत क्रिकेट संघाच्या कर्णधाराचा मोठ्या फरकाने विजय
मुर्तझाने नराली-२ या मतदारसंघातून निवडणूक लढवली. मतदारांनी त्याला भरभरून मते दिली. एकूण २ लाख ७४ हजार ४१८ मते मोर्तजाला मिळाली. त्याच्या विरुद्ध निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला केवळ ८००६ मते मिळाली. अलिकडे क्रिकेटरांचा राजकारणातील प्रवेश वाढत चालला आहे.
