ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये प्रथमच पुरुष खेळाडूना मिळणार हीट ब्रेक

open
वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये २०१९ पासून प्रथमच पुरुष सिंगल्स खेळणाऱ्या खेळाडूना हीट ब्रेक दिला जाणार आहे. या काळात खेळाडूना उन्हाचा खूप त्रास होतो अशी तक्रार नेहमी केली जाते. त्यामुळे नव्या वर्षापासून तापमान ४० डिग्रीवर असेल आणि खेळाडूंनी उन्हाची तक्रार केली तर त्यांना १० मिनिटांसाठी हा ब्रेक दिला जाणार आहे. विशेषतः सिंगल्स खेळणारया पुरुष खेळाडूना तिसऱ्या सेटमध्ये असा ब्रेक घेता येणार आहे. डेव्हीस कप साठीही हि सुविधा दिली जाणार आहे.

यावर्षी जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये तापमान ४० अंशांवर गेले होते. त्यामुळे हि एक्स्ट्रीम हीट पॉलिसी विचारात घेतली गेली. यात महिला आणि ज्युनिअर खेळाडूना १० मिनिटाचा तसेच व्हीलचेअर वरून खेळणाऱ्या खेळाडूना १५ मिनिटाचा ब्रेक देण्याचा निर्णय घेतला गेला होता. एकेरी स्पर्धातील पुरुष खेळाडूंसाठी मात्र त्याचा विचार केला गेला नव्हता. तो या वर्षी केला गेला आहे. या स्पर्धा १४ जानेवारीपासून सुरु होत आहेत.

Leave a Comment