मोहम्मद शमी कसोटीत अशी कामगिरी करणारा ५वा गोलंदाज

mohammad-shami
मेलबर्न – ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सुरू असलेला तिस-या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात मोहम्मद शमीने पॅट कमिन्सला बाद करताच त्याच्या नावावर विदेशात १०० गडी बाद करण्याचा नवीन पराक्रम झाला.

कपिल देव यांनी भारताकडून विदेशात सर्वात प्रथम १०० गडी बाद केले होते. तसेच भारतीय गोलंदाजात त्यांच्या नावावर विदेशात सर्वात जास्त गडी बाद करण्याचा विक्रम आहे. पॅट कमिन्सला मोहम्मद शमीने बाद करताच त्याचा विदेशात १०० गडी बाद करण्याच्या यादीत समावेश झाला. तो भारताकडून अशी कामगिरी करणारा ५ वा गोलंदाज ठरला आहे. विदेशात शमीने २८ कसोटीत १०० गडी तर, भारतात ११ कसोटी सामन्यात ४० गडी बाद केले आहेत.

Leave a Comment