विवियन रिचर्ड्स यांची २०१९ विश्वचषकाबाबत भविष्यवाणी, हाच संघ जिंकणार विश्वचषक

Viv-Richards
मुंबई – इंग्लंडमध्ये २०१९ साली होणारा विश्वचषक इंग्लंड, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियासारख्या संघाला नमवून भारताचा सध्याचा संतुलित संघ विश्वविजेता होऊ शकतो, अशी भविष्यवाणी विंडीजचे दिग्गज खेळाडू विवियन रिचर्ड्स यांनी केली आहे.

पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या देशांना भारत चांगले आव्हान देऊ शकतो. इंग्लंडचा संघ देखील चांगला खेळत आहे. पण तो शेवटच्या क्षणी मागे पडतो. नेहमीच त्यांचा संघ चांगला राहिला आहे. पाकिस्तान आणि भारत हे यंदाच्या विश्वचषकात दोन असे संघ आहेत जे कुणालाही नमवू शकतात. ऑस्ट्रेलियाचा संघ तुल्यबळ असल्यामुळे तोही विजेतेपदाच्या शर्यतीत येऊ शकतो, असेही रिचर्ड्स म्हणाले.

विंडिज संघाबद्दल रिचर्ड्स यांना विचारल्यावर ते म्हणाले की, त्यांना यंदाच्या वर्षात चमकदार कामगिरी करता आली नाही. मला आशा आहे की तो संघ पुन्हा दमदार कामगिरी करुन दाखवेल. आपण मर्यादित षटकाच्या सामन्यात कसे खेळतो यावर सारे अवलंबून असते. आपला दिवस चांगला नसेल तर आपल्या कोणताही संघ हरवू शकतो, असेही ते म्हणाले. भारताने परदेशातील तुल्यबळ संघांना त्यांच्या मायदेशात धूळ चारली आहे. सध्या भारत एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या स्थानी आहे, तर इंग्लंड पहिल्या स्थानी आहे.

Leave a Comment