बाहेरून काटेरी पण गुणांनी मोठे फळ अननस

pineapple
अननस हे फळ दिसायला काटेरी दिसत असले तरी ते माणसाच्या अर्योग्यासाठी अतिशय उपयुक्त फळ आहे. आपण अन्य फळे जितक्या आवडीने खरेदी करतो तितक्या आवडीने अननस खरेदी केला जात नाही. मात्र या फळात अनेक प्रकारची खनिजे आहे त्यामुळे अननस खाणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे.

अननसाच्या सेवनाने पोटाचे विकार बरे होतात, पचनशक्ती वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वजन कमी करण्यासही अननस अतिशय उपयुक्त आहे. अननसात सी व्हीटॅमीन भरपूर प्रमाणात आहे तसेच कॅन्सरला अटकाव करणरे एजंट यात आहेत. अननसाच्या नियमित सेवनाने कॅन्सर होण्याची शक्यता जवळजवळ संपुष्टात येते.

pine
अननसात असलेल्या ब्रोमलीनमुळे सांधेदुखी तसेच संध्यावरील सूज कमी होते. अननसात फायबर खूप प्रमाणात आहे त्यामुळे पोट साफ राहते तसेच यात असलेल्या मॅग्नेशियम, बीटा कॅरोटीनमुळे हाडे बळकट होतात तसेच थायमिन हृदयासाठी लाभकारी आहे. ज्यांना खूप दमायला होते किंवा आजारातून उठल्याने उत्साह वाटत नाही किंवा उन्हामुळे गळाल्यासारखे होत असेल त्यांनी मोसंबी आणि अननस यांच्या रसाचे सेवन केल्यास त्वरित तरतरी येते.

Leave a Comment