तब्बल 9 कोटींची आहे या महिलेची जीभ

tongue
तुम्ही आजपर्यंत महागडे कपडे, घर, गाडी, दागिने, वस्तु यांच्याबद्दल ऐकले असेल पण तुम्ही कधी महागड्या जीभेबद्दल ऐकल आहे का? होय, हे खर आहे, तब्बल 9 कोटी रूपये एवढी एका महिलेच्या जीभेची किंमत आहे. हायलेई कर्टिस नावाच्या महिलेच्या जीभेची किंमत कॅडबरी कंपनीने 9 कोटी रूपये लावली आहे.
tongue1
या महिलेच्या जीभेची किंमत 9 कोटी रूपये तिच्या चवीच्या खासियतमुळे आहे. हायलेइ कर्टिस नावाच्या महिलेच्या जीभेचा फेमस कॅडबरी चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीने 1 मिलीयन पाउंडाचा विमा केला आहे. भारतीय रूपयांमध्ये ज्याची किंमत 81,537,870.34 रुपये म्हणजे जवळपास 9 कोटी रूपये होतात.
tongue2
ही महिला कॅडबरीच्या 300 लोकांच्या चॉकलेट टेस्टिंग टीमची सदस्य आहे आणि चॉकलेटच्या परफेक्ट स्वादासाठी ती त्याला टेस्ट करण्याचे काम करते. त्यामुळे चॉकलेट एक्सपर्ट हायलेइच्या टेस्टबड्सचा विमा केला आहे. त्या महिलेला या विम्यामुळे सक्त ताकिद देण्यात आली आहे की, ती असे कोणतेच काम करू नये ज्यामुळे तिच्या स्वाद इंद्रीयांना नुकसान होईल. डॉक्टरही सांगतात की, पुरूषांपेक्षा महिलांमध्या स्वाद इंद्रीयाची शक्ती जास्त असते.

Leave a Comment