या हिरे व्यापाऱ्याने केले तब्बल ३००० मुलींचे कन्यादान

mahesh-savani
कधी कर्मचा-यांना बोनस म्हणून गाडी तर कधी विविध वस्तू भेट देण्यामुळे हिऱ्याचे व्यापारी सावजी ढोलकिया यांचे नाव सर्वांनी अनेक वेळा ऐकले असेल. पण आता आणखी एक हिरे व्यापारी महेशभाई सवाणी चर्चेत आले आहेत. गरजू व अनाथ मुलींचे लग्न लावून देण्याचे पुण्यवान काम सवाणी हे करतात. जवळपास २८६६ मुलींचे गेल्या ९ वर्षात त्यांनी कन्यादान केले आहे. तर लवकरच २३१ मुलींचा विवाह लावून देणार आहेत. सगळीकडे त्यांच्या या कामाची चर्चा केली जात आहे.

महेशभाई सवाणी हे कार्य देशातील मुलींच्या प्रति आपले काही तरी कर्तव्य लागते या भावनेतून सढळ हाताने करत असतात. त्यांचे हे कार्य धर्म व जातीच्या भिंती ओलांडून सुरू असते. २३ डिसेंबर २०१८ रोजी सवाणी २३१ मुलींचे कन्यादान करणार केले आहे. यामध्ये ६ मुस्लिम व ३ ख्रिश्चन तरुणींचा समावेश आहे. या सर्व तरुणींचा विवाह पीपी सवाणी विद्या संकूलच्या समोरील रघुवीर वाडीमध्ये लावून दिला आहे. हा आकडा गृहित धरला तर लग्न लावून दिलेल्या मुलींची संख्या ३०९७ च्या घरात जाईल.

‘लाडली’असे नाव या लग्नसोहळयाला देण्यात आले होते. हा विवाह सोहळा एक वर्षापूर्वी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या भूमी नामक मुलीच्या नावावर समर्पित करण्यात आला आहे. फक्त लग्न लावून महेशभाई सवाणी थांबत नाहीत. लग्न लावून दिल्यानंतर संबंधित तरुणींच्या भविष्याची संपूर्ण जबाबदारी ते आपल्या खाद्यांवर उचलतात. त्यांच्या सर्व गरजा, मुला-मुलींचे शिक्षण, उपचार, कपडे यासाठी आर्थिक पाठबळ पुरविण्याचे काम ते न चूकता करत असतात.

सरकारी योजनांचा लाभ या विवाहित मुलींना मिळवा यासाठी देखील ते प्रयत्नशील असतात. सर्व तरुणींना आपल्या मुली समजून ते जावयाला रोजगार मिळवून देण्यामध्ये देखील मदत करतात. विशेष म्हणजे त्यांनी मुलींना दत्तक घेण्यासाठी अर्ज सुद्दा केला आहे. याशिवाय संकटकालीन स्थितीत मुलींना मदत व्हावी यासाठी ते आपत्तकालीन निधीच्या एका योजनेवर काम सुद्घा करत आहेत.

Leave a Comment