श्रीनगरची उबदार भिंत हिवाळ्यात देतेय मायेची ऊब

bhint
काश्मीरमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडते आहे आणि या थंडीपासून बचाव होण्यासाठी तेथील गरीब नागरिक झगडत आहेत. अश्यावेळी कोणताही स्वार्थ न ठेवता या लोकांना मायेची ऊब देणारी वॉल ऑफ काइंडनेस अनेकांचा आधार बनली आहे. श्रीनगरच्या लाल चौकात झेलम नदीकाठी असलेली हि लालपांढरी भिंत अंगावर एक इंग्रजी निरोप घेऊन उभी आहे. या भिंतीवर अनेक खिळे आणि हुक लावले गेले आहेत. भिंतीवर मजकूर आहे, टेक इफ यु नीद, हँग इफ यु हॅव. म्हणजे गरज असेल तर घ्या, तुमच्याकडे जास्तीचे असेल तर टांगा.

काश्मीरमधील युवा गात हु इज हुसेन यांनी हि भिंत सुरु केली आहे. वास्तविक अश्या भिंती आज अनके मोठ्या शहरातून दिसू लागल्या आहेत आणि त्यांना माणुसकीची भिंत म्हटले जाते. मात्र याची सुरवात झाली ती २०१५ साली इराण मध्ये. तेथील अर्थव्यवस्था तेव्हा खूपच नाजूक होती आणि अनेक लोक बेरोजगार झाले होते. तेव्हा त्यांच्या मदतीसाठी सज्जाद बुल्वार्द बॅनरखाली स्थानिक युवकांनी वॉल ऑफ काइंडनेस नावाने हे अभियान सुरु केले होते.

श्रीनगर मधील या मायेची ऊब देणाऱ्या भिंतीपाशी लोक येतात. ज्यांना गरज आहे ते येथे टांगलेले गरम कपडे, चपला, अन्नपदार्थ घेतात आणि ज्याच्याकडे पुरेसे आहे ते लोक येथे कपडे, चपला, ब्रेड दुध यासारखे पदार्थ ठेऊन जातात. यासाठी सरकारी अथवा कोणत्याही संस्थेची मदत नाही. ३० युवकांनी पदरमोड करून हा प्रयोग सुरु केला आणि आता त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Leave a Comment