येथे स्पष्ट दिसतात दोन समुद्रांचे वेगळे रंग

ocean
हिंदी महासागर आणि पॅसिफिक म्हणजे प्रशांत महासागर जेथे अलास्काच्या खाडीत एकमेकांना मिळतात तेथे हे दोन्ही समुद्र अगदी स्पष्ट वेगळे ओळखता येतात कारण या दोन्ही समुद्रांच्या पाण्याचे दोन वेगळे रंग येथे दिसतात. त्यामुळे या दोन समुद्रांचे पाणी एकमेकात मिसळत नाही असे म्हटले जाते.

असे दोन वेगळे रंग का दिसतात याचा अभ्यास संशोधक सतत करत आहेत. एक मत असे आहे कि ग्लेशियर मधून जे पाणी येथे ते निळ्या रंगाचे दिसते तर महासागरातून जे पाणी येते ते जास्त निळे दिसते. ग्लेशियर मधून येणारे पाणी गोड असते तर महासागरचे पाणी खारट असल्याने या दोन पाण्याच्या घनतेत फरक येतो. खारट पाणी अधिक घनतेचे असते. त्यामुळे दोन पाणी एकमेकांत मिसळत नाहीत.

अन्य मताप्रमाणे या पाण्यावर जेव्या सूर्यकिरणे पडतात तेव्हा ते रंग वेगळे दिसतात व त्यामुळे दोन्ही समुद्राचे पाणी एकमेकांत मिसळत नाही असा भास होतो.

Leave a Comment