अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे व्हाईट हाऊस झपाटलेले !

white-house
अमेरिका हा जगातील सर्वात शक्तीशाली देशांपैकी एक समजला जातो. या देशातील वैज्ञानिक प्रगती जगातील इतर देशांच्या मानाने किती तरी पटीने आघाडीवर आहे. तरीही या देशामध्ये असे ही एक रहस्य आहे, ज्याची उकल येथील वैज्ञानिक देखील करू शकलेले नाहीत. आणि हे रहस्य इतर कुठल्या गोष्टीशी निगडित नसून, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या औपचारिक निवास्थानाशी निगडित आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे औपचारिक निवासस्थान व्हाईट हाऊस झपाटलेले आहे असे म्हटले जात असून, यामागील रहस्याचा आजतागायत उलगडा होऊ शकलेला नाही.
white-house2
व्हाईट हाऊसच्या परिसरामध्ये अनेक रहस्ये दडलेली असून, त्यांच्याशी निगडित अनेक कथा येथे प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर पूर्वराष्ट्रपती अब्राहम लिंकन यांचे अस्तित्व आजही या ठिकाणी जाणवत असल्याचे म्हटले जाते. अब्राहम लिंकन अमेरिकेचे सोळावे राष्ट्रपती असून, १८६५ साली व्हाईट हाऊस मधेच लिंकन यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी लिंकन यांना पाहिले असल्याचे व्हाईट हाऊसमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितले.
white-house1
अमेरिकेचे तिसावे राष्ट्रपती केल्विन कूलिज यांच्या पत्नी ग्रेस कूलिज यांनी ही आपल्याला लिंकन यांचे अस्तित्व व्हाईट हाऊसमध्ये सातत्याने जाणवत असल्याचे म्हटले होते. व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्रपतींचे कार्यालय असणाऱ्या ओव्हल ऑफिसमध्ये लिंकन यांना अनेकदा पाहिले गेले असल्याचे म्हटले जाते. ग्रेस यांच्याशिवाय येथे काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी देखील लिंकन यांना पाहिले असल्याचे म्हटले आहे. केवळ इतकेच नाही, तर औपचारिक भेटीच्या निमित्ताने व्हाईट हाऊस येथे आलेल्या परदेशी पाहुण्यांना देखील लिंकन यांचे दर्शन घडले असल्याचे अनेक किस्से येथे प्रसिद्ध आहेत.
white-house3
या बाबतीतला एक किस्सा खास प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते, की ब्रिटनचे एक मंत्री महोदय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेण्याच्या निमित्ताने आले असून, त्यांचा मुक्काम व्हाईट हाऊस मधेच होता. जेव्हा मंत्री साहेब त्यांच्या खासगी कक्षामध्ये स्नान उरकून बाहेर आले, तेव्हा कक्षामधील शेगडी पेटलेली असून, त्या शेगडी जवळील खुर्चीवर अब्राहम लिंकन बसले असल्याचे धक्कादायक दृश्य त्यांना पाहायला मिळाले असेल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment