बार गर्ल इन इंडिया, गुगल सर्च दाखवितोय सोनिया गांधी

sonia
गुगल सर्च रिझल्ट वरून अमेरिका आणि पाकिस्तान या दोन देशांनी गुगलवर टीकेची झोड उठविली असताना आता भारत याच कारणाने चर्चेत आला आहे. इडियट असा सर्च दिल्यावर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे नाव झळकते आहे, भिकारी सर्च केल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान याची माहिती दिसते आहे तसेच बार गर्ल इन इंडिया सर्च केल्यावर कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचे नाव आणि माहिती प्रथम दिसते आहे. इटलियन बार गर्ल इन इंडिया या सर्चवरही सोनिया गांधी यांचीच माहिती दिसते आहे.

केवळ गुगलच नाही तर बिंग सर्च इंजिनवरही हाच प्रकार होतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार १९ डिसेंबरला बार गर्ल सर्च ट्रेडिंग यादीत आघाडीवर होता. उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, राजस्तान आणि उत्तरप्रदेशात सर्वाधिक सर्च केला गेला होता. पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर कॉंग्रेस आणि सोनिया यांच्या विरोधात सोशल मिडीयावर कॅम्पेन चालविले गेले त्यात अनेक फेसबुक पेजेस, ग्रुप्सवर राजकारणात येण्यापूर्वी सोनिया गांधी बार डान्सर होत्या असा मजकूर देण्यात आला होता. त्यामुळे गुगल सर्चवर हा प्रकार घडला असावा असे सांगितले जात आहे. या संदर्भात सोनिया गांधी यांचे बनावट फोटोहि शेअर केले गेले आहेत.

Leave a Comment