सानिया मिर्झाला वाटते बाळाला नजर लागण्याची भीती

sania
भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा ऑक्टोबरमध्ये आई झाल्यानंतर तिच्यामध्ये आईसुलभ भावना निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. सानिया आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब यांच्या मुलाचे म्हणजे इजान मिर्झा मलिक याचे फोटो सोशल मिडीयावर आलेले नाहीत. सानिया आणि शोएबच्या चाहत्यांना बाळाचे फोटो पहायची खूप उत्सुकता असली तरी फोटो सोशल मिडीयावर शेअर न करण्याचे कारण सानियाने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिले आहे.

सानिया म्हणते, तुम्ही मला मूर्ख म्हणाल याची कल्पना आहे. पण नजर लागते याच्यावर माझा विश्वास आहे. सध्या आम्ही दोघे इजानचे पालनपोषण आणि देखभाल अतिशय काळजीपूर्वक करत आहोत. त्याचे फोटो नजर लागेल या भीतीने सोशल मिडीयावर शेअर न करण्याचा निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतला आहे.

सानिया पुढील वर्षात टेनिस कोर्टवर उतरेल असे समजते. कोर्टवर वापसी संदर्भात बोलताना ती म्हणाली माझ्या दोन्ही गुडघ्यावर तसेच मनगटावर शस्त्रक्रिया झाल्या आहेत आणि सिझेरिअन ही झाले आहे. त्यामुळे प्रथम मला वजन कमी करून स्वतःला फिट करायचे आहे आणि त्यानंतर खेळाचा विचार करायचा आहे.

Leave a Comment