लोम्बार्गिनी उरुस ला प्रचंड मागणी

lamborgini
लोम्बार्गिनीच्या उरूस या पहिल्याच एसयुवीला ग्राहकांकडून प्रचंड मागणी येत असून ३ कोटी रु.किमतीची हि कार भारतात जानेवारी २०१८ मध्ये लाँच झाली आहे. या गाडीची लोकप्रियता खूपच वाढली असल्याने तिच्या मागणीत वाढ झाली आहे. परिणामी ही एसयुव्ही खरेदी करण्यासाठी आता प्रतीक्षायादी असून ९ महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. या गाडीचे पहिले युनिट हातोहात विकले गेले होते. भारतातील ग्राहक या गाडीसाठी प्रतीक्षा करण्यास तयार असल्याचेही सांगितले जात आहे.

मागणीत वाढ झाल्याने कंपनीने डिलिव्हरी टाईम वाढविला असून त्याचा परिणाम भारतावरही झाला आहे. या कारला ४.० लिटरचे ८ सिलिंडर असलेले व्ही ८ ट्वीनटर्बोचार्ज्ड इंजिन, ८ स्पीड अॅटोमॅटीक ट्रान्समिशनसह दिले गेले आहे. ही सर्वाधिक वेगवान एसयुव्ही ० ते १०० किमीचा वेग ३.६ सेकंदात घेते आणि तिचा सर्वाधिक वेग आहे ताशी ३०५ किमी. प्रतीलिटर ही एसयूव्ही ८ लिमी मायलेज देते. या ५ सीटर एसयुव्हीला खास ब्रेकिंग सिस्टीम दिली गेली आहे. त्यामुळे ब्रेक लावल्यावर फक्त ३३.५ मीटर अंतरात या कारचा वेग १०० किमीवरून ० किमीवर आणता येतो.

Leave a Comment