व्हिडिओ; धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटची राशिद खानकडून पुन्हा एकदा पुनरावृत्ती

rashid-khan
अफगाणिस्तानच्या राशिद खानने नुकत्याच झालेल्या टी-१० लीगमध्ये हेलिकॉप्टर शॉट खेळत सगळ्यांची वाहवा मिळवली होती. महेंद्रसिंह धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टर शॉट प्रसिद्ध करण्यात मोठा वाटा आहे.राशिद खानने बुधवारी दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० लीगमध्ये खेळताना या हेलिकॉप्टर शॉटची पुन्हा एकदा पुनरावृत्ती करुन दाखवली आहे. राशिद खानने हा फटका डरबन हिट संघाकडून खेळत असताना १७ व्या षटकात खेळत षटकार ठोकला.


आपल्याला डरबन हिट संघाने विजयासाठी दिलेले १८९ धावांचे आव्हान सहज पूर्ण केले. राशिद खानने या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आपले भरीव योगदान दिले. सोशल मीडियावर त्याचा हा हेलिकॉप्टर शॉट व्हायरल व्हायला लागल्यानंतर सनराईजर्स हैजराबाद आणि टॉम मूडी यांनीही त्याच्या फटक्याचे कौतुक केले आहे.

Leave a Comment