लाहोर – देश विदेशात आपल्या अजब स्टाइलमुळे पाकिस्तानचा टीव्ही रिपोर्टर चांद नवाब खूप गाजला. सलमान खानचा चित्रपट बजरंगी भाईजानचा एक कॅरेक्टर वारंवार रीटेक घेणाऱ्या या रिपोर्टरने इंस्पायर केला. आता त्याच चांद नवाबच्या तोडीचा आणखी एक पाकिस्तानी रिपोर्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाकिस्तानी रिपोर्टरच्या मागे लाईव्ह रिपोर्टिंग करताना लागले कुत्रे
ईमानदार रिपोर्टर!
कुत्तों के डर से कैमरे का फ़्रेम छोड़ा लेकिन साइन ऑफ़ में कैमरामैन का नाम नहीं। 👍
अब ये अपने ही मुल्क पाकिस्तान में ट्रोल हो रहा है। चाँद नवाब के बाद मैदान फाँद नवाब। pic.twitter.com/f1dKtWGUhw
— Umashankar Singh (@umashankarsingh) December 9, 2018
त्या रिपोर्टरवर काहींना दया आली. तर काही पोट धरून हसत आहेत. तो यात श्वानांच्या एका शोची रिपोर्टिंग करत होता आणि बूम सोडून त्याला पळ काढावा लागला. हा पाकिस्तानी रिपोर्टर व्हिडिओमध्ये एका डॉग रेसची रिपोर्टिंग करत होता. शोचा लाइव्ह टेलिकास्ट करत असताना तो पीटूसी देत होता. अचानक त्यावेळी कुत्र्यांचा समूह त्याच्या दिशेने पळत सुटला. रिपोर्टर एवढा घाबरला की काहीच बोलू शकला नाही. तो शेवटी कॅमेरामन आणि चॅनलचे नाव तर सोडाच आपले नाव सुद्धा विसरला.