अहमदनगर – अहमनगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द काढल्याने त्याचे पद गमवावे लागले, तसेच भाजपनेही त्याला पक्षाबाहेर हाकलले. अहमदगनर महापालिकेची निवडणूक या सगळ्या गोष्टी घडूनही अपक्ष म्हणून लढवणारा छिंदम विजयी झाला आहे. त्याच्या पत्नीला पराभवाचा सामना करावा लागला. पण या निवडणुकीत श्रीपाद छिंदमने यश मिळवले.
नगर महापालिकेत विजयी झाला शिवरायांबाबत अपशब्द काढणारा श्रीपाद छिंदम
श्रीपाद छिंदम पहिल्या काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होता. पण तो नंतर आघाडीवर गेला आणि त्याचा विजयही झाला. अहमदनगरच्या प्रभाग क्रमांक ९ मधून श्रीपाद छिंदमने सर्वसाधारण जागेवर निवडणूक लढवली होती आणि विजयी झाला. छिंदमने सहाव्या फेरीनंतर चारशे मतांची आघाडी घेतली. तर त्याने तेराव्या फेरीपर्यंत १८५० मतांची आघाडी घेतली.
छिंदमविरोधात या प्रभागात राष्ट्रवादीच्या अनिता राजेंद्र राठोड, शिवसेनेचे सुरेश रतनप्रसाद तिवारी , भाजपचे प्रदीप परदेशी, मनसेचे पोपट भानुदास पाथरे, अपक्ष प्रवीण शाहूराज जोशी, अपक्ष निलेश सत्यवान म्हसे, अपक्ष अजयकुमार अरुण लयचेट्टी हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. दरम्यान छिंदमची पत्नी स्नेहा छिंदमने प्रभाग १३ मधून निवडणूक लढवली. मात्र तिचा पराभव झाला.