ईव्हीएमची पूजा केल्या प्रकरणी श्रीपाद छिंदमचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात

shripad-chindam
अहमदनगर- नगर पोलिसांनी श्रीपाद छिंदमचा भाऊ श्रीकांत छिंदम यांना ताब्यात घेतले असून श्रीकांत यांनी रविवारी अहमदनगर महापालिका निवडणुकीच्या मतदानावेळी पुरोहिताकडून मतदान यंत्राची पूजा केल्याची घटना घडली होती.

अहमदनगर महापालिका निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. श्रीकांत छिंदम यांनी त्यावेळी मतदान केंद्रावर पुरोहिताकडून मतदान यंत्राची पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यांच्यासोबत यावेळेस भाजपच्या एकमेव महिला उमेदवार अंजली वालाकट्टीदेखील उपस्थित होत्या. छिंदम यांना या प्रकारानंतर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासह ७ ते ८ जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment