महादेव जानकर व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे वादाच्या भोवऱ्यात

mahadev-jankar
बीड – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करता आणि माझ्याकडे आरक्षण मागता. आरक्षण मागायचे असेल, तर भाजपकडे मागा, असे गंभीर वक्तव्य केल्याची महादेव जानकर यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जानकर या क्लिपमुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जानकर यांना बीड येथील एका विशाल पांढरे नावाच्या कार्यकर्त्याने फोन लावला होता. जानकर यांनी हे वक्तव्य त्यावेळी बोलताना केले. राजकीय वर्तुळात याबाबत मोठी चर्चा होत असून महादेव जानकर यांच्यावर धनगर समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या भावना वादग्रस्त वक्तव्यामुळे दुखावल्याचे पाहायला मिळत आहे. बीड येथील कार्यकर्ता विशाल पांढरे यांनी ४ दिवसांपूर्वी जानकर यांना फोन लावला. फोनवर त्याने जानकरांना ४ वर्षे झाले तरी धनगर समाजाला आरक्षण का मिळत नाही? असा प्रश्न केला. जानकर त्यावर उत्तर देताना म्हणाले, की अगोदर पक्षाचे काम करा आणि नंतर आरक्षण मागा.

पुढे जानकर म्हणाले, की काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुका आल्यावर मतदान करता आणि माझ्याकडे आरक्षण मागता. राष्ट्रीय समाज पक्षाचा मी नेता आहे. आरक्षण मागायचे असेल, तर तिकडे भाजपकडे मागा. सबंध धनगर समाजाच्या भावना त्यांच्या या वक्तव्यामुळे दुखावल्याचा आरोप धनगर समाजाचे कार्यकर्ते विशाल पांढरे यांनी केला आहे.

Leave a Comment