जगातील सर्वाधिक उंच रेल्वे पुल मणिपूरमध्ये होणार

manipur
जगातील सर्वधिक उंचीचा रेल्वे पुले मणिपूर मध्ये बांधला जात असून नॉर्थइस्ट फ्रंटीअर रेल्वेकडून हे काम सुरु आहे. हा पूल १४१ मीटर उंच असून त्याच्या पिलर उभारणीचे काम वेगाने सुरु आहे. हा पूल जीरीबाम, तुपूल आणि इंफाळ या शहरांना जोडेल. या मार्गावर ४५ बोगदे आहेत आणि त्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा १०. ८० किमी अंतराचा आहे. पूर्वोत्तर राज्यातील हा सर्वाधिक लांबीचा बोगदा असेल.

मुंबई पुणे रेल्वे मार्गावर असेच अनेक बोगदे आहेत मात्र मणिपूर मधील बोगद्यांची संख्या आणि लांबी खूपच अधिक आहे. या पुलाचे काम हायड्रोलिक पद्धतीने केले जात असून पिलरची उंची अधिक असल्याने त्याच्या कामात स्लीपफार्म तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे असे रेल्वे अधिकारी म्हणाले.

Leave a Comment