महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी ऋषभ पंतची बरोबरी

rishabh-pant
अॅडलेड कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यष्टीरक्षणाची जबाबदारी मिळालेल्या ऋषभ पंतने महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पहिल्या डावात ऋषभने यष्टींमागे ६ झेल टिपत, धोनीच्या एका डावात यष्टींमागे सर्वाधिक झेल घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. २००९ साली न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटीत महेंद्रसिंह धोनीने पहिल्या डावात यष्टींमागे ६ झेल घेतले होते.

ऋषभने अॅडलेड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी यष्टींमागे उस्मान ख्वाजा, पीटर हँडस्काँब आणि कर्णधार टीम पेनचा झेल घेतला. तर पंतने तिसऱ्या दिवशी मिचेल स्टार्क, ट्रॅविस हेड आणि जोश हेजलवूड यांचा झेल टिपला. एकाच डावात यष्टींमागे सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम हा पाकिस्तानचे माजी यष्टीरक्षक वासिम बारी, इंग्लंडचे बॉब टेलर, न्यूझीलंडचे इयान स्मिथ आणि वेस्ट इंडिजचे रिडली जेकब्स यांच्या नावावर जमा आहे. या सर्व यष्टीरक्षकांनी एका डावात ७ झेल टिपले होते. दरम्यान पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाला २३५ धावांमध्ये ऑलआऊट करत १५ धावांची आघाडी घेतली आहे.

Leave a Comment