यासीर शहा अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा जगातला एकमेव गोलंदाज

yasir-shah
अबूधाबी – तीन कसोटी सामन्यांची मालिका पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असून यासीर शहाने मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी २ बळी घेताच २०० कसोटी बळी त्याच्या नावे झाले आहेत. अवघ्या यासीर शहा हा ३३ कसोटी सामन्यात २०० बळी मिळवणाच्यी ऐतिहासिक कामगिरी करणारा जगातील पहिलाच गोलंदाज बनला आहे.


यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे फिरकीपटू चार्ली ग्रिमेट याच्या नावावर सर्वात जलद २०० कसोटी बळी मिळवण्याचा विक्रम होता. ३६ कसोटी सामन्यात त्यांनी २०० बळी घेतले होते. हा पराक्रम त्यांनी १९३६ साली केला होता. यानंतर तब्बल ८२ वर्षांनी हा विक्रम पाकिस्तानचा गोलंदाज यासीर शहाने आपल्या नावावर केला आहे. सर्वात जलद २०० कसोटी बळी घेण्याच्या यादीत भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ३७ सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या चौथ्या सामन्यात यासीर शहाने सामन्याच्या चौथ्या दिवशी सलामीवीर टॉम लॅथमला १० धावांवर तर, विलियम सोमरविलेला ४ धावांवर पायचित केले.

Leave a Comment