रोहित शर्माने अॅडलेड कसोटीत तोडला आफ्रिदीचा विक्रम

rohit-sharma
अॅडलेड – हिटमॅन रोहित शर्माने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेड यथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत ३७ धावा करत शाहिद आफ्रिदीचा एक मोठा विक्रम मोडीत काढला. कसोटी क्रिकेटमध्ये ११ महिन्यानंतर पुनरागमन करणा-या रोहित शर्माने काही शानदार फटके मारले. पण मोठी खेळी करण्यास तो अपयशी ठरला. पण असे असले तरी आफ्रिदीचा एक मोठा विक्रम रोहितने आपल्या नावावर केला आहे.

शाहिद आफ्रिदीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात एकूण ११ हजार १९६ धावा आहेत. रोहितने केलेल्या ३७ धावांमुळे रोहितच्या खात्यात आता ११ हजार २०७ धावा जमा झाल्या आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात धावांच्या बाबतीत रोहितने आफ्रिदीला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चालू असलेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या सामन्यात रोहितने आक्रमक सुरुवात केली होती. पण त्याला मोठी खेळी साकारण्यात यश आले नाही.


आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने ७४५४, कसोटीत १५१६ तर टी-२० मध्ये २२३७ धावा केल्या आहेत. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण पुजारा वगळता एकही भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याचा सामना करू शकला नाही.

Leave a Comment