सुरत ठरले जगात सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर

surat
गुजराथेतील हिरेनगरी सुरत जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेल्या २० शहरात पहिल्या क्रमांकावर असल्याचे ग्लोबल इकॉनिमिक रिसर्चच्या नुकत्याच सादर झालेल्या अहवालात म्हटले गेले आहे. जगातील वेगाने विकसित होणाऱ्या पहिल्या २० शहरात १७ भारतातील आहेत. भारताच्या भविष्यातील जीडीपी ग्रोर्थ रेट संदर्भात हा अहवाल महत्वाचा ठरणार आहे. उपलब्ध आकडेवारीवरून २०१९ ते २०३५ या काळासाठी हा अहवाल बनविला गेला आहे.

या यादीत सुरतपाठोपाठ २ नंबरवर आग्रा, ३ नंबरवर बंगलोर तर ४ क्रमांकावर हैद्राबाद आहे. त्यापाठोपाठ नागपूर, तीरपूर, राजकोट, तिरुचिरापल्ली, चेन्नई, विजयवाडा यांचा नंबर आहे. सुरत हिरे व्यापारासाठी प्रसिद्द असून तेथून जगभरात हिरे व्यापार केला जातो. त्याचबरोबर हे महत्वाचे आयटी हब आहे. भारताबाहेर आफ्रिकेतील नोम पे हे सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहर आहे.

लोकसंख्येचा विचार केला तर २०३५ पर्यंत पहिल्या दहा शहरात मुंबईचा समावेश नाही मात्र जीडीपी बहुल शहरात भारत स्टार परफॉर्मर ठरला आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून २०३५ मध्ये न्यूयॉर्क प्रथम क्रमांकावर असेल तर त्यापाठोपाठ टोक्यो, लॉसअन्जेलीस, शांघाई आणि लंडन यांचा क्रमांक असेल.

Leave a Comment