व्हायरल होत आहे ड्वॅन ब्राव्होचा ‘कोंबडी डान्स’

Bravo
फक्त आपल्या मैदानातल्या खेळामुळेच नाही तर आपल्या डान्स आणि गाण्यांमुळेही वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ड्वॅन ब्राव्हो प्रसिद्ध आहे. ब्राव्हो युएईमध्ये पार पडलेल्या टी-१० क्रिकेट लीगमध्ये मराठा अरेबियन्सकडून खेळला. ब्राव्हो यातल्याच एका मॅचमध्ये विकेट घेतल्यानंतर वेगळ्याच अंदाजात थिरकला. बॅट्समनही ब्राव्होचा जल्लोष बघून स्वत:चे हसणे रोखू शकला नाही.

सोशल मीडियावर ड्वॅन ब्राव्होच्या या जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ब्राव्हो या व्हिडिओमध्ये कोंबडीसारखा डान्स करताना दिसत आहे. ब्राव्होने टी-१० क्रिकेट लीगमध्ये कॅच पकडल्यानंतर मैदानातच कोंबडी डान्स केला.


शारजाहमध्ये रविवारी झालेल्या टी-१० लीगच्या एलिमिनेटर फायनलमध्ये अफगाणिस्तानचा ऑल राऊंडर मोहम्मद नबी आऊट झाला. ब्राव्होने नबीची विकेट गेल्यानंतर असे सेलिब्रेशन केले. नबीला त्याच्याच बॉलिंगवर ब्राव्होने कॅच आऊट केले. ब्राव्होने या मॅचमध्ये ४ विकेट घेतल्या आणि २७ रनवर तो नाबाद राहिला. ब्राव्होच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे मराठा अरेबियन्सने बंगाल टायगर्सना ७ विकेटने हरवले.

Leave a Comment