नवी दिल्ली – स्टेट बँकेने काही दिवसांपूर्वीच जुन्या चेक बुकबाबत घोषणा केल्यानंतर बँकेने आता आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी असून आतापर्यंत एटीएममधून स्टेट बँकेच्या ग्राहकांना पैसे काढताना काही बंधने होती. पण ग्राहकांना आता दरमहा अनलिमिटेड एटीएम व्यवहार करता येणार आहेत. बँकेने यासाठी एक अट घातली आहे.
एसबीआयच्या ग्राहकांना आता करता येणार दरमहा अनलिमिटेड एटीएम व्यवहार
तुम्हाला एटीएममधून हवे तेवढे पैसे काढायचे असल्यास खात्यामध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवावा लागणार आहे. अनलिमिटेड एटीएम व्यवहार करण्यासाठी दर महिन्याला सरासरी १ लाख रुपये ठेवणे बंधनकारक आहे. तरच ग्राहक एटीएम कार्डद्वारे अनलिमिटेड व्यवहार करू शकता. दर महिन्याला ग्राहकांना काही ठराविक वेळा फ्री आणि अनलिमिटेड व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी असा आदेश रिझर्व्ह बँकेने एसबीआयला दिला आहे.
याआधी ३१ ऑक्टोबर २०१८पासून स्टेट बँकेने आपल्या ‘क्लासिक’ आणि ‘माइस्ट्रो’ या डेबिट कार्डधारकांसाठी एटीएममधून रक्कम काढण्याची दैनंदिन मर्यादा ४० हजार रुपयांवरून २० हजार रुपयांवर आणली आहे. एसबीआयचे ग्राहक सध्या दर महिन्याला आठ वेळा एटीएमने व्यवहार करू शकतात. त्यातील पाच वेळा ग्राहकांना एसबीआयची एटीएम मशीन वापरावी लागते. तर तीन वेळा ते इतर कोणत्याही ही बँकेच्या एटीएममधून पैसे काढू शकतात.