हरमनप्रीत आणि स्मृती मनधना यांचा रमेश पोवारला पाठींबा

harmanpreet-kaur
मुंबई – माजी क्रिकेटपटू रमेश पोवार हेच भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून हवे आहेत, असे पत्र टी-२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि फलंदाज स्मृती मनधना यांनी बीसीसीआयला पाठविले आहे. सध्या मिताली राज आणि रमेश पोवार यांच्यात वाद सुरू असून पोवार यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप मितालीने केले होते. मिताली ३६ वाढदिवस साजर करत असताना कौर आणि मनधना यांनी एक बाऊंसर टाकून मितालीला धक्का दिला.

प्रशासकीय समितीचे सदस्य विनोद रॉय आणि दिना इदुल्जी, कार्यकारी अध्यक्ष, सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आणि सरव्यवस्थापक साबा करीम यांना हरमनप्रीत हिने मेल केला आहे. ती म्हणते, प्रशिक्षक म्हणून रमेश पोवार यांना कायम ठेवावे, अशी विनंती मी हरमनप्रीत टी-२० संघाची कर्णधार आणि एकदिवसीय संघाची उपकर्णधार तुम्हाला करीत असल्याचा उल्लेख तिने मेलमध्ये केला आहे. न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यासाठी १ महिना शिल्लक आहे आणि विश्वचषकासाठी १५ महिने शिल्लक आहेत. अशा स्थिती मला वाटते की प्रशिक्षक बदलाचे काही कारण नाही. पोवार यांनी आम्हाला एकसंध ठेवले आहे, असेही ती म्हणाली.

पोवार यांनी वर्ल्ड टी-२० मालिकेदरम्यान माझ्यासोबत गैरवर्तन केले होते, असा आरोप मितालीने केला होता. क्रिकेट जगतात तिच्या आरोपामुळे खळबळ उडाली होती. बीसीसीआयने प्रशिक्षक हवे असल्याची जाहिरात देऊन पोवार यांची उचलबांगडी करण्याचे संकेत दिले. या सर्व घडामोडीनंतर दोन प्रमुख महिला खेळाडूंनी बीसीसीआयला पत्र पाठविले.

Leave a Comment