चीनची कंपनी लिंकश्योर नेटवर्क संपूर्ण जगाला देणार ‘फ्री वायफाय’

Wi-fi
लवकरच संपूर्ण जगाला चीनची कंपनी लिंकश्योर नेटवर्क मोफत वायफाय सेवा देण्याची शक्यता असून याबाबत कंपनीच्या मते, पुढीलवर्षी चीनमधील गासू प्रांतातील जिऊकुआं उपग्रह स्थानकावरुन ते त्यांचे पहिले उपग्रह लाँच केले जाईल आणि अंतराळात असे १० उपग्रह २०२० पर्यंत पाठवण्याचे नियोजन केले आहे. अंतराळात लिंकश्योरचे २०२६ पर्यंत असे २७२ उपग्रह कार्यरत राहतील. संपूर्ण जगाला त्याच्या माध्यमातून मोफत वायफाय नेटवर्क उपलब्ध होईल.

याबाबतची माहिती कंपनीचे सीईओ वाँग जिंगयिंग यांनी दिली. कंपनी ही योजना यशस्वी करण्यासाठी ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर भविष्यात यातून मोठी कमाई होऊ शकेल. याबाबत चीनमधील एका वृत्तपत्राच्या मते, लोकांना अंतराळातून येणाऱ्या वायफाय नेटवर्कला आपले स्मार्टफोन्स सहजपणे कनेक्ट करता येतील. तसेच टेलिकॉम नेटवर्कही जिथे पोहोचत नाही तिथेही याचे नेटवर्क जाईल.

एका अहवालानुसार, इंटरनेटच्या सेवेपासून अजूनही जगातील ३०० कोटीहून अधिक लोक दूर आहेत. स्पेसएक्सला याचवर्षी अंतराळात ७ हजार स्टारलिंक उपग्रह पाठवण्यास परवानगी मिळाली आहे. स्पेसएक्स येणाऱ्या काळात अंतराळातून पृथ्वीवर इंटरनेट सेवा पाठवणारे १६०० उपग्रह अंतराळात पाठवणार आहे. स्पेसएक्स शिवाय गुगल, वनवेब आणि टेलिसॅटसारख्या कंपन्याही अशाच पद्धतीची योजना अंमलात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. या कंपन्यांचे उपग्रह आणि बलून्सही अंतराळातून संपूर्ण पृथ्वीवर हायस्पीड वायफाय सेवा उपलब्ध करण्याचे काम करतील.

Leave a Comment