मुशफिकुर रहीमने कसोटी क्रिकेटमध्ये रचला नवा विक्रम

Mushfiqur-Rahim
ढाका – विडींजविरुद्ध शेर-ए-बांगला क्रिकेट मैदानावर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाअखेर बांगलादेश संघाने ५ बाद २५९ धावा केल्या असून बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीमने या सामन्यात १४ धावांची खेळी करत कसोटी क्रिकेटमधील एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

विडींजविरुद्ध ८ धावा करताच कसोटी क्रिकेटमध्ये मुशफिकुर रहीमच्या नावावर ४ हजार धावा जमा झाल्या आहेत. तो अशी कामगिरी करणारा बांगलादेशचा दुसराच फलंदाज ठरला आहे. बांगलादेशकडून या आधी ४ हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम तमीम इकबालने केला होता.

६६ कसोटी सामन्यांमध्ये मुशफिकुरच्या नावावर ३५.३२ च्या सरासरीने ४ हजार ६ धावा आहेत. यात ५ शतके आणि २४ अर्धशतकांचा, तर २ द्विशतकांचा समावेश आहे. तसेच बांगलादेशकडून कसोटीत सर्वाधिक वैयक्तिक धावा काढण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे.

Leave a Comment