भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेडकडे मुंबई मेट्रोला चाके पुरविण्याचे कंत्राट

मुंबई – मुंबई मेट्रोला चाके पुरवण्याचे कंत्राट भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड (बीईएमल) या सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीला मिळाले असून केंद्र सरकारची खाण उद्योग आणि वाहन क्षेत्राला अवजड साहित्य पुरवणारी कंपनी म्हणून बीईएमल ही ओळखली जाते.

मेट्रोच्या २A, २B आणि ७ या ३ टप्प्यातील प्रकल्पांना चाके पुरवण्याचे काम बीईएमल कंपनीला मिळाले आहे. हे कंत्राट ३ हजार १५ कोटीचे असून या कंत्राटाची घोषणा करण्यात मुंबई मेट्रोपॉलिटीन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीकडून (एमएमआरडीए) आली. प्राथमिक चाचणीत रेल्वेच्या बोग्यांसह इतर काम पुढील वर्षापर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान एमएमआरडीएसमोर आहे. जे पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे. रेल्वेच्या या चाचणी परिक्षणानंतर प्रत्येक तिमाहीत १२ रेल्वे गाड्यांचा पुरवठा करण्याचे काम बीईएमकडे सोपवण्यात आले आहेत.

दहीसर ते डीएन नगर, अंधेरी ते दहीसर या दरम्यानच्या ३७८ मेट्रोंसाठी एमएमआरडीएकडून बोलवण्यात आलेल्या या बोली प्रक्रियेत देश विदेशातील विविध संस्थांकडून बोली लावण्यात आली होती. ज्यात दक्षिण कोरियाची ह्य़ुंदाई रोटेम, बॉम्बेर्डियर इंडिया आणि बॉम्बेर्डियर जर्मनी, चीनची सीआरआरसी कार्पोरेशन, भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड, टीटागढ वॅगन्स, टीटागढ फायरमा, अॅलस्टॉम ट्रान्सपोर्ट इंडिया इत्यादी कंपन्यांनी या बोलीत भाग घेतला होता. एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी या संदर्भात माहिती दिली.

Leave a Comment