वोल्वोने सादर केली भारतात बनलेली प्लग इन हायब्रीड कार

volvo
मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत व्होल्वोने भारतात असेम्ल्य केलेल्या प्लग इन हायब्रीड एक्ससी ९० कारचे पहिले मॉडेल गुरुवारी सादर केले आहे. येत्या ३ वर्षात या श्रेणीतील आणखी ४ मॉडेल कंपनी सादर करणार आहे. हि कार म्हणजे पेट्रोल इंजिन, बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटर यांचे कॉम्बिनेशन आहे.

हि कार सुरवातीचे ४० किमी विजेवर व नंतर हायब्रीड मोड मध्ये पेट्रोल इंजिनवर चालेल. यामुळे कारचे मायलेज वाढणार आहे. या कारच्या ग्राहकांना दोन इलेक्ट्रिक चार्जर मोफत दिले जाणार आहेत. त्यातील पहिला घरात तर दुसरा कार्यालयात बसविता येईल. कंपनीचे तज्ञ घरी येऊन हे चार्जर सेट करून देणार आहेत.

या कारमध्ये एअर फिल्टरसाठी असे तंत्रज्ञान वापरले गेले आहे ज्यामुळे बाहेर हवेचे प्रदूषण जास्त असले तर कारमधील प्रवाशांना शुद्ध हवा मिळू शकणार आहे. २०२५ पर्यंत १० लाख इलेक्ट्रिक कार्स रस्त्यावर आणण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे.

Leave a Comment