आता सॅमसंग आणणार ६ कॅमेरेवला ५ जी स्मार्टफोन

s10
जगातला पहिला ४ रिअर कॅमेरेवाला स्मार्टफोन लाँच केल्यानंतर आता कोरियन जायंट सॅमसंग लवकरच ६ कॅमेरे असलेला गॅलेक्सी एस १० सिरीज मधील स्मार्टफोन तयार करत असून हे एस १० सिरीजचे टॉप मॉडेल असेल असे सांगितले जात आहे. हा फोन ५ जी ला सपोर्ट करेल. २०१९ मध्ये हा फोन बाजारात येईल असे समजते.

अर्थात कंपनीने या संदर्भात अधिकृत घोषणा अद्यापि केलेली नाही. मिडिया रिपोर्टनुसार असा फोन बाजारात आणला गेला तर तो ६ कॅमेरे असलेला जगातील पहिलाच स्मार्टफोन ठरेल. मिळालेल्या माहितीनुसार या फोन ला ६.७ इंची डिस्प्ले, ४ रिअर कॅमेरे आणि सेल्फी तसेच व्हिडीओ कॉलिंगसाठी दोन फ्रंट कॅमेरे दिले जाणार आहेत. स्मार्टफोन मध्ये दोनपेक्षा अधिक कॅमेरे देण्याचे आयफोनकडे जाते मात्र आजकाल बहुतेक सर्व स्मार्टफोन उत्पादक कंपन्या त्यांच्या फोन मध्ये दोनपेक्षा अधिक कॅमरे देत आहेत.

Leave a Comment