या देशातील तरुण युवक सोमवारची उत्सुकतेने पाहतात वाट

monday
बहुतेक ठिकाणी रविवार हा सुट्टीचा दिवस असतो आणि त्यामुळे सोमवार अनेकांना आवडत नाही कारण रविवारच्या सुटीनंतर पुन्हा कामाला लागा असे हा दिवस सांगत असतो. काही देशात मात्र नागरिक त्यातही युवक सोमवारची उत्सुकतेने वाट पाहतात कारण या दिवशी त्यांना आवडलेल्या कोणत्याही मुलीच्या अंगावर बादल्यातून पाणी ओतून तिला भिजविण्याची पूर्ण मुभा असते. हा या देशांच्या परंपरेचा भाग असून त्याला वेट मंडे म्हटले जाते.

monday1
पोलंड, चेक गणराज्य, पूर्व युरोपातील युक्रेन हा देशात ही परंपरा पाळली जाते. त्यामागचे कारण मनोरंजक आहे. या देशात ख्रिश्चन धर्म स्वीकारला गेल्यावर वेट मंडे पर्व साजरे करण्याची प्रथा सुरु झाली. इस्टरच्या सोमवारी एकमेकांवर पाणी ओतले तर पापे धुतली जातात असा समज आहे. खरी प्रथा अशी कि सुंदर मुलीला डोक्यापासून पायापर्यंत पाण्याने भिजविले आणि तिने कोणतीही तक्रार केली नाही तर त्या माणसाची पापे धुतली जातात.

नंतर या प्रथेत बदल घडला आणि आपल्या आवडत्या मुलीला पाण्याने भिजवायची प्रथा सुरु झाली. अर्थात मुलीनाही त्यांची पापे धुण्याची संधी दिली जाते त्यासाठी मंगळवार निश्चित केला गेला. या दिवशी मुलीनी मुलांच्या अंगावर पाणी ओतून त्यांना भिजवायचे. पण आता सोमवारीच हि पाण्याची होळी खेळली जाते आणि तरुण मुले मुली त्यात मोठ्या आनंदाने सहभागी होतात.

Leave a Comment