आजपासून २४ तास सुरु राहणार विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन

combo
पंढरपूर : आजपासून कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन २४ तास सुरू असणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील १९ नोव्हेंबर रोजी विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करणार आहेत.

विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मंदिर २७ नोव्हेंबरपर्यंत २४ तास खुले असणार अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. याआधीही ३१ ऑक्टोबरला कार्तिकी यात्रा सोहळ्या निमित्त ऑनलाइन दर्शन बंद करुन २४ तास दर्शन सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता. त्यानंतर २५ ऑक्टोबरपासून व्हीआयपी दर्शन पासही बंद करण्यात आले होते. दिवाळी सुट्टी आणि कार्तिकी यात्रा सोहळ्यानिमित्त पंढरीत येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत असल्याने समितीने हा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment