नवी दिल्ली – दस्तुरखुद्द अॅपल कंपनीकडून आयफोन एक्स मोबाईल फोनच्या स्क्रीन टचमध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. अत्यंत संवेदनशील अशी काही मोबाईलची स्क्रीन झाली असून, यामुळे ग्राहकांना अनेक तांत्रिक अ़डचणींना सामोरे जावे लागत आहे.
अॅपलकडून आयफोन एक्सच्या स्क्रीन टचमध्ये बिघाड असल्याचा खुलासा
कंपनीने यासंदर्भात अनेक खुलासे केले आहेत. काही मोबाईल फोनमध्ये स्क्रीन टच न करताही अनेक अॅप्लीकेशन्स अचानकपणे सुरू होण्याचे प्रकार घडले आहेत. हा फोन एक वर्षापूर्वी बाजारात विक्रीसाठी आला आहे. या प्रकाराची तक्रार मागील काही महिन्यांपासून ऑनलाईन ग्राहकांकडून करण्यात आली होती. तर कुठल्याही प्रकारचे शुल्क न आकारता स्क्रीन बदलून देण्याचे कंपनीने जाहीर केले.