मॉडेल लॉरेनने टॅम्पोनच्या वापरामुळे गमावले दोन्ही पाय

tampons
नवी दिल्ली – मासिक पाळीच्या वेळेस अनेक महिला सॅनिटरी पॅडसचा तसेच, टॅम्पोनचा वापर करतात. पण आरोग्यासाठी टॅम्पोनचा वापर करणे घातक ठरू शकते. तसेच, बऱ्याच वेळापर्यंत टॅम्पोन बदलला न गेल्यास जंतुसंसर्गही होऊ शकतो. मॉडेल लॉरेन वेसल हिच्यावर टॅम्पोनमुळे झालेल्या जंतुसंसर्गामुळे दोन्ही पाय गमावण्याची वेळ आली.

या मॉडेलने इन्स्टाग्रामवरून हा अनुभव शेअर केला. अगदी मरणासन्न अवस्थेत तिला तिच्या घरातून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ती त्यावेळी उलटी आणि विष्ठेच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली होती. हृदय विकाराचा झटकाही तिला आला. एक-एक अवयव शक्तिहीन होत ती कोमात गेली. तिच्या या अवस्थेचे कारण डॉक्टरांनी ‘टॅम्पोनचा वापर’ आणि त्यामुळे झालेला जंतुसंसर्ग हे असल्याचे सांगितले. तिला टॉक्सीक शॉक सिंड्रोम (टीएसएस) झाल्याचे निदान झाले. याचा तिच्या उजव्या पायावर परिणाम होऊन वयाच्या २४व्या वर्षी पाय कापण्याची वेळ आली.

टॅम्पोनचा वापर महिलांना पॅडसच्या तुलनेत आरामदायी वाटतो. पण एकच टॅम्पोन ८ तासांहून अधिक काळ वापरणे जीवावर बेतू शकते. एकदा टॅम्पोन बदलणे लॉरेन विसरून गेली होती. उजवा पाय कापल्यानंतरही तिच्या दुखण्याने पुन्हा डोके वर काढले. सहा वर्षांनी तिच्या डाव्या पायालाही उजव्या पायासारखीच लक्षणे जाणवू लागली. लॉरेनला २९ व्या वर्षी डावा पायही गमवावा लागला.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment