चीनची वृत्तसंस्था असलेल्या झिन्हुआच्या बातम्या सांगतो आहे चक्क रोबोट

robo
बीजिंग- गेल्या दहा वर्षांत जगभर माहिती-तंत्रज्ञान आणि संगणकीय प्रणालीचा वापर यामुळे प्रचंड स्थित्यंतर घडून आली. तंत्रज्ञानात आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे आणखी भर पडली आहे. चीनची आघाडीची वृत्तसंस्था असलेल्या झिन्हुआने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून बातम्या देणाऱ्या रोबो अँकरची निर्मिती केली आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर अन्य क्षेत्राप्रमाणे माध्यम क्षेत्रातही वाढला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून झिन्हुआने मानवी चेहरा असलेला रोबो अँकर तयार केला आहे. हुबेहूब चेहरापट्टी आणि उच्चारामुळे खराखुरा अँकर असल्याचा भास होतो.


स्वत: माहिती गोळा करून रोबो अँकर शिकतो. याबाबत झिन्हुआ वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार तो इतर अँकरप्रमाणे बातम्या सांगू शकतो. रिपोर्टर टीमचा हा रोबो अँकर भाग आहे. २४ तास तो झिन्हुआ संकेतस्थळासाठी काम करतो आहे. रोबो अँकरची निर्मिती बातम्यांची गती वाढवणे तसेच खर्च कमी करणे यासाठी केल्याचे वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधिंनी सांगितले.

Leave a Comment